पतीच्या विवाहबाह्य संबंधांना ब्रेक लागेना , पुण्यात विवाहित महिलेने अखेर ..

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळ जनक असा प्रकार समोर आलेला असून आपल्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत अनेकदा सांगून देखील त्याच्या वर्तनात बदल होत नाही हे लक्षात आल्यानंतर हतबल झालेल्या एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. ज्याच्यासोबत संसाराची सुखी स्वप्न पाहिली तो इतरत्र नादी लागला सांगूनही त्याच्यात बदल होत नाही म्हणून अखेर विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, निर्गुण भोलानाथ तिखंडे ( वय 26 वर्ष राहणार वराळे तालुका मावळ ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केलेली आहे. तीन तारखेला त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मयत महिलेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिलेल्या असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आपली मुलगी सासरी नांदत असताना तिचा पती निर्गुण याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध सुरू झाले त्यानंतर त्याने आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि नांदायचे असेल तर माहेराहून पैसे घेऊन ये असे म्हणत तिचा छळ सुरू केलेला होता. त्याच्या त्रासाला वैतागून आपल्या मुलीने आत्महत्या केलेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *