पती परदेशात गेल्यावर पत्नी प्रियकरासोबत ठेवायची संबंध, परवा घरचे झोपताचं त्याला बोलावल्यावर गेमचं झाला

Crime News : उत्तर प्रदेशच्या उन्नाव पोलिसांनी 21 फेब्रुवारीच्या रात्री घरातील रूममध्ये महिलेच्या झालेल्या मृत्यूबाबत खुलासा केला आहे. पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, मृत विवाहित महिलेची हत्या दुसरी कुणी नाही तर तिच्या प्रियकरानेच केली. तेच आरोपीने प्रेयसीच्या हत्येचं जे कारण सांगितलं ते हैराण करणार आहे.

आरोपी सतीशने सांगितलं की, तो आणि मृत विवाहित महिला बऱ्याच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रेयसीचा पती परदेशात नोकरीसाठी गेल्यावर ते आणखीन जवळ आले. दोघे नेहमीच भेटत होते. पण नंतर तो हळूहळू तिच्यापासून दूर जाऊ लागला होता. कारण त्याला हे नातं आणखी पुढे वाढवायचं नव्हतं. त्याला तिचा पिच्छा सोडायचा होता.

सतीशने आपला गुन्हा कबूल करत सांगितलं की, ती विवाहित असल्या कारणाने त्याला आता तिच्यासोबत जास्त काळ संबंध ठेवायचे नव्हते. अशात तो तिच्यापासून दूर जाण्यासाठी संधी शोधत होता. अशात 21 फेब्रुवारीला घरातील सगळे झोपल्यावर महिलेने सतीशला रूममध्ये बोलवलं. इथे दोघांनी आधी शारीरिक संबंध ठेवला. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यावर वार केला नंतर साडीने गळा आवळून तिची हत्या केली.

रात्री साधारण 1 वाजता बाजूला झोपलेल्या 8 महिन्यांच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. अशात महिलेची सासू तिथे आली. रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. दरवाजा उघडला तर सूनेचा मृतदेह पडलेला दिसला. लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. महिलेल्या सासूच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी सतीशला अटक केली.

लग्नाच्या दीड वर्षानंतर पती दुबईला नोकरीसाठी निघून गेला. अशात महिला जास्तकरून आपल्या माहेरीच राहत होती. 5 तारखेला ती सासरी आली होती. सतीशला तिच्यासोबत केवळ स्वार्थासाठी संबंध ठेवायचे होते. पण महिलेला त्याच्यासोबत पुढेही संबंध ठेवायचे होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावरूनच ही हत्या झाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *