पती वेड्यावाकड्या पद्धतीने सेक्स करायचा अन् कंटाळलेली पत्नी महाराष्ट्रातुन भोपाळला गेल्यावर…

भोपाळ : पती आणि पत्नीचं नातं हे अतिशय प्रेमाचं,खास आणि जिव्हाळ्याचं असतं असं म्हणतात.मात्र,बर्याचदा अशा काही घटना समोर येतात,ज्या सगळ्यांनाच हादरवुन सोडणाऱ्या असतात.अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशच्या इंदुरमधून समोर आली आहे.यात आपल्या बायकोसोबत अननॅचरल सेक्स करणाऱ्या पतीला इंदुर पोलिसांनी मुंबईतुन अटक केलं आहे.त्यानंतर कोर्टात हजर करून पतीला तुरुंगात टाकण्यात आलं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी कि,सतना येथे राहणाऱ्या एका महिलेने इंदुरमधील एमजी रोड पोलीस ठाण्यात तिच्याच नवर्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता.महिलेने पोलिसांना सांगितलं की,तिचं ५ वर्षांपुर्वी मुंबईत राहणाऱ्या अभिषेक निगमसोबत लग्न झालं होतं.मात्र लग्नानंतर तिचा पती तिच्यासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवायचा.

पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नी इंदुरच्या एमजी रोड येथे राहु लागली.पण महिलेचा त्रास इथेचं थांबला नाही.इंदुरमध्ये येऊन पतीने पीडितेसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले.त्यामुळे त्रास असह्य झालेल्या महिलेने एमजी रोड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनीही प्रकरणाची गांभीर्यता समजुन घेत आरोपी पतीचा शोध सुरू केला.

सायबर टिमच्या मदतीने पोलिसांनी फोनच्या आधारे आरोपीचा सातत्याने शोध घेतला.मात्र याच्यातचं आरोपी पती परदेशात पळुन गेला.तरीही पोलीस सतत त्याचे लोकेशन ट्रेस करत होते.आरोपी मुंबईत परतताच एमजी रोड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक टिना शुक्ला यांनी हवालदार योगेंद्र जोशी यांच्यासह मुंबई गाठुन आरोपीला बेड्या ठोकल्या.त्यानंतर त्याला इंदुरच्या जिल्हा न्यायालयात हजर करून तुरुंगात रवानगी करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *