पत्नीच्या जेवणात ड्रग्स मिसळुन नशा चढवली, पोलिसासह ड्रायव्हरला बोलावलं, तब्बल ५१ लोकांनी तिला कित्येकदा…

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका इसमावर पत्नीला भोजनातून अमली पदार्थ मिसळून ती नशेत असताना तिच्यावर परपुरुषांकडून बलात्कार करवून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधी घडला असून, द टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार या प्रकाराबाबत अज्ञात असलेल्या पत्नीवर हा अत्याचार दहा वर्षे सुरू होता. या दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी बलात्काराच्या ९२ प्रकरणांची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी २६ ते ७३ वयोगटातील ५१ पुरुषांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. यामधील एक फायरमॅन, एक ट्रक ड्रायव्हर, एक नगरसेवक, एक बँकेतील आयटी कर्मचारी, जेल गार्ड आणि एका पत्रकाराचाही समावेश आहे.

आरोपी इसम त्याच्या पत्नीला जेवणामध्ये औषध मिसळून द्यायचा. त्यानंतर तो परपुरुषांना पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या घरी बोलवायचा. या बलात्काराच्या घटना २०११ ते २०२० दरम्यान घडल्या असून, यातील बहुतांश पुरुषांनी या महिलेवर वारंवार बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पती लैंगिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करत असे.

तसेच ते चित्रण यूएसबी ड्राइव्हवर फाइलमध्ये ठेवायचा. हे सर्व चित्रिकरण पोलिसांकडे आहे. या दाम्पत्याच्या विवाहाला अनेक वर्षे झाली असून, त्यांना तीन मुलेही आहेत. आरोपी इसम एका अश्लील वेबसाइटवरून परपुरुषांच्या संपर्कात आला होता. २०२० मध्ये आरोपी इसमाविरोधात चेंजिंग रूममध्ये महिलांची रेकॉर्डिंग करण्यासाठी हिडन कॅमेऱ्याचा वापर झाल्याची आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला. पीडित महिलेला जेव्हा या प्रकाराबाबत सांगण्यात आले, तेव्हा तिला जबर धक्का बसला. ती तणावाखाली गेली. त्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *