पदरात २ मुलं; हिंगोलीत मध्यरात्री पत्नीच्या गळ्यावर लाथ मारुन घेतला जीव अन् सकाळच्या ७ वाजेपर्यंत पत्नीशेजारी बेडवर…

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. हिंगोली तालुक्यातील दिग्रस इथे पत्नीसोबत वारंवार शाब्दिक बाचाबाची व खटके उडत असल्याने मध्यरात्री पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना ७ मे रोजी सकाळी उघडकीस आली. यामुळे हिंगोली ग्रामीण पोलिसांनी पतीला तात्काळ ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील सोन्ना येथील योगिताचा मागील १० वर्षांपूर्वी दिग्रस येथील संतोष बळीराम कराळे यांच्यासोबत विवाह झाला होता. या दरम्यान त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे आपत्य झाले. काही दिवस हा सुखी संसार सुरू होता. परंतु, काही दिवसानंतर किरकोळ कारणावरून संतोष व योगितामध्ये वाद विवादाच्या घटना घडू लागल्या. हळूहळू रोज वाद सुरू झाला. अखेर शनिवारी संतोषची आई दोन मुलांसह लग्नाला नातेवाईककडे गेली होती. आणि वडील शेतामध्ये कामाकरिता गेले होते. त्यामुळे संतोष व त्याची पत्नी योगिता हे दोघेच घरी होते.

यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने संतोषने योगिताच्या गळ्यावर लाथ मारून दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो रात्रभर मृतदेहाजवळच झोपला होता. ७ मे रोजी संतोषने सोलना इथे माहेरी संपर्क साधून योगिताचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. परंतु, माहेरच्यांचा संशय बळवल्याने त्यांनी याबाबतची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली.

पोलिसांना माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मदन पवार यांचे प्रकाश स्थळ घटनास्थळी जाऊन पोहोचले. त्यानंतर योगिताचा मृतदेह हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

सायंकाळी शवविच्छेदन झाल्यावर डिग्रस कराळे येथे मयत योगितावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. आरोपी पतीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून याबाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *