‘पप्पा कधी येणार तुम्ही’ अन् आले पार्थिव; भवानी पेठेतील जवान दिलीप ओझरकर कारगिल येथे शहीद

लष्कर : भवानी पेठ येथील भारतीय सैन्यातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे कारगिल येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांच्या दिलीप ओझरकर यांचे बालपण भवानी पेठ येथे गेले असून, त्यांचे १० पर्यंतचे शिक्षण कॅम्प एज्युकेशन शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे डॉ. आंबेडकर महाविद्यालयात झाले. ते गेल्या २० वर्षांपासून भारतीय सैन्यात सैनिक म्हणून कर्तव्य बजावत होते.

सध्या ते हवालदार या पदावर कार्यरत होते. गेल्या दीड महिन्यापूर्वी ते घरी सुटीवर आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. काल रविवारी दुपारी ३ च्या दरम्यान शहीद ओझरकर हे आपल्या इतर सहकाऱ्यांसह सैन्याच्या गाडीतून कारगिल येथून प्रवास करत होते. अचानक गाडीचा अपघात झाल्याने त्यादरम्यान त्यांचे सर्व सहकारी हे जखमी झाले, मात्र ओझरकर हे या अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव उद्या पहाटे सैन्याच्या विशेष विमानाने पुण्यात येईल. सकाळी ६ वा. त्यांच्या ८२४ भवानी पेठ येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सकाळी सात वाजता पार्थिवावर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धोबीघाट येथील स्मशानूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली.

निवृत्तीनंतरही त्यांनी देशसेवेला दिली हाेती पसंती
दिलीप ओझरकर १५ एप्रिल २००४ राेजी भारतीय लष्करात भरती झाले हाेते. दीड-दाेन वर्षांपूर्वीच ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले हाेते; मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून घेत देशसेवा करण्यास पसंती दिली हाेती. दरम्यान, सराव माेहिमेसाठी जात असताना ३ सप्टेंबर राेजी दुपारी ३ वाजता गाडीचा अपघात झाला. अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पप्पा कधी येणार, हा प्रश्न राहिला अनुत्तरीतच!
ओझरकर वर्षातून एकदा दहीहंडी व गणेशोत्सवाला आवर्जून येत होते. ३ सप्टेंबर रोजी सकाळीच त्यांचे लहान मुलांशी फोनवर संभाषण झाले होते. पप्पा कधी येणार तुम्ही, अशी विचारणा सतत मुले करीत होती. वडिलांनी त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवर असल्याचे दाखवले. सोमवारी रात्री लोहगाव विमानतळावर त्यांचे पार्थिव आणण्यात आले. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात धोबीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *