पालकांचा नकळत चुकीने घेतला चिमुरडीचा जीव, सांगलीत डाॅक्टरचा ४ वर्षाच्या लेकीचा शेवट

मिरज : मिरजेत झारीबाग येथे अपार्टमेंटच्या 5 व्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी नीलेश देशमाने या ४ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला.यशवी हि डॉ.नीलेश देशमाने यांची कन्या असुन,देशमाने दाम्पत्य यशवीला घरात झोपवुन बाहेर गेले असताना हि घटना घडली.

मिरजेतील क्ष-किरणतज्ज्ञ डॉ. नीलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये ५ व्या मजल्यावर राहतात.डॉ. देशमाने यांना २ कन्या आहेत.मोठी मुलगी आजारी आहे.

सोमवारी रात्री तिला दवाखान्यात घेऊन जाताना लहान मुलगी यशवी झोपली असल्याने डॉक्टरने घराला कुलूप लावुन बाहेर गेले.मात्र,गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करायला विसरले.

थोड्या वेळात जागी झालेली यशवी पालकांचा शोध घेत गॅलरीत गेली.तेथुन इमारतीच्या ५ व्या मजल्यावरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली.तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मंगळवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली.पालकांच्या एका चुकीमुळे चिमुरडीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *