पुण्याची १५ वर्षाच्या लखपती मुलीचं नगरच्या मनोजवर प्रेम जडलं अन् पळुन नगरमध्ये येताचं घरात….

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला पुणे येथून पळवून नगरमध्ये आणले आणि त्यानंतर सदर मुलगी ही अल्पवयीन असताना देखील तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि मुलगी गर्भवती होताच तिला माहेरी सोडून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

उपलब्ध माहितीनुसार , पुणे येथील खडकीतील एका ३५ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अनुराग मनोज होळकर(वय ३०) असे  या युवकाचे नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सप्टेंबर ऑक्टोबर २०२० मध्ये ही घडलेली असून पीडित कुटुंबीय आता या मुलाचा शोध घेत आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५  वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर अनुराग होळकर याने प्रेमसंबंध निर्माण केले आणि त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०२० मध्ये रेल्वेने अहमदनगर येथे पळवून नेले. नगर जिल्ह्यातील एका गावात नेऊन तेथे एका मंदिरात तिच्याशी लग्न केले आणि तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असताना तिला डिलिव्हरीसाठी म्हणून २३ जानेवारी २०२२ रोजी माहेरी आणून सोडले आणि तो फरार आला.

फरार झालेला युवक आज येईल उद्या येईल या आशेने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याची वाट पाहिली मात्र तो परत आलाच नाही त्यामुळे पीडित मुलगी आणि कुटुंबियांना फसवले गेल्याची जाणीव झाली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली . तो नेमका कुठे गेलाय याचीही कुटुंबियांना माहिती नाही तर त्याचा नगर येथील पत्ता देखील पीडित कुटुंबियांना माहित नाही त्यामुळे त्याला शोधून काढणे हे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिलेले आहे . सहायक पोलीस निरीक्षक भाबड अधिक तपास करीत असल्याचे समजते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *