पुण्यातील IPS अधिकारी पुर्णपणे नग्र होऊन मोलकरणीशी अश्लिल बोलत बसायचा, पोलिस भरतीसाठी महिलेनी चक्क…

Pune Crime पुणे : पुण्यातून हादरवणारी (Pune Crime ) बातमी समोर आली आहे. शहरात नियुक्त असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या अधिकाऱ्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार..!
तक्रारदार महिला ह्या ठाण्यातील कळवा येथे राहतात. त्या घरकाम करतात. दरम्यान अष्टेकर यांनी महिलेच्या फेसबुकवर सुरुवातीला हाय असा मेसेज केला. त्यांच्या मेसेजला तक्रारदार महिलेने प्रोफाईल फोटोवरून ते जबाबदार नागरिक असल्याचे दिसत असल्याने प्रतिसाद दिला. त्यानंतर अष्टेकर तिला सतत मॅसेज करू लागले फोन करू लागले.

यावेळी आपण आयपीएस आहोत. सध्या पोलीस भरतीचे काम करत आहोत. तुला पोलीस भरती व्हायचे आहे का, अशी विचारणा केली. आपल्याला नाही माझ्या बहिणीच्या मुलाला भरती व्हायचं आहे, असे तक्रारदार महिला म्हणाली.
दरम्यान, महिलेची गरज ओळखून अष्टेकर सतत फोन व व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करू लागले. त्यानंतर त्यांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. शिवाय ते महिलेशी अश्लिल बोलत असतं. व्हिडिओ कॉलवर नग्न असायचे. असे लाजीरवाने कृत्य त्यांनी केले.

या प्रकारानंतर महिलेने त्यांचे व्हाट्सअप ब्लॉक केले. याप्रकारानंतर महिला घाबरून गेली. यावेळी त्या चित्रा साळुंखे या वकिलांच्या संपर्कात आल्या व त्यानंतर त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *