पुण्यात इंजिनीअरने आईच्या चेहऱ्यावर पिशवी घालून खून मग स्वत:ला संपवल; कारण जाणुन डोळे भरुन येतील
पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 42 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन, त्यानंतर त्यांचा चेहरा प्लास्टिक पिशवीत घालून निर्घृण हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील धनकवडी परिसरात गणेश मनोहर फरताडे हा आई निर्मला फरताडे यांच्यासह राहत होता. गणेश काम करत नव्हता आणि त्याच्यावर कर्जही होते. गणेश हा इंजिनिअर होता अशीही माहिती समजते. तसंच त्याची आई आजारी असल्यानं औषधांसाठी खर्च होत होता. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं गणेशने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. आईच्या हत्येनंतर त्यानं आत्महत्या केली. या प्रकरणी गणेशच्या मावस बहिणीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
गणेशने आई निर्मला यांना औषधांचा ओव्हर डोस दिला. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक पिशवी घालून खून केला. यानंतर घराच्या छतावर जाऊन त्यानं गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकऱणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.