पुण्यात इंजिनीअर बाप गेला पण जातांना लेकरासह बायकोला भयंकर मृत्यू दिला, थरकाप उडवणारी घटना

पुणे : पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये ३ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने पुणे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औंध भागात राहणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा अशा ३ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.

आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि ९ वर्षीय मुलाला पॉलिथीन बॅगने दाबून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

मृतांमध्ये पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली (वय 40), मुलगा तनिष्क गांगुली (वय. 08) आणि पती सुदिप्तो गांगुली (वय. 44 ) समावेश आहे. हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याचे कळत असून तो पुण्यात एका आय टी कंपनी मध्ये काम करत होता. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास पोलिस करत आहेत.

नेमकं काय घडलं?
काल (मंगळवार) संध्याकाळनंतर सुदिप्तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर सुदिप्तोच्या भावाने मित्राला सांगून घरी जाण्यास सांगितले. मित्र घरी गेल्यानंतर त्याला दरवाजा बंद दिसला. त्यानंतर पोलिसांत मिसींगची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले असता ते घरातच असल्याचे कळाले. त्यानंतर दरवाजा तोडून आत गेल्यानंतर एका रुममध्ये सुदिप्तोने गळफास घेतला होता तर दुसऱ्या खोलीत त्याची पत्नी आणि मुलगा अवस्थेत आढळून आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *