पुण्यात चौकीतचं नवरीच्या आईने २ सेकंदात फेडली साडी, फक्त पुरुष कर्मचारी हजर असल्याचा फायदा घेत…
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार मुंडवा येथे समोर आलेला असून मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका महिलेने पोलीस चौकीत फक्त पुरुष कर्मचारी असल्याचा गैरफायदा घेत चक्क स्वतःची साडी काढत पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आलेले आहे त्यामुळे तीन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे . घोरपडी पोलीस चौकीमध्ये 11 मे रोजी दुपारी ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अजय दिलीप सरदार ( वय 23 वर्ष घोरपडी ) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचारी असलेले तुळशीराम रासकर यांनी याप्रकरणी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. एका महिलेच्या मुलाने प्रेमसंबंधातून विवाह केलेला होता मात्र मुलगा खूप वाईट आहे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे यापूर्वी देखील त्याचा घटस्फोट झालेला असल्याने मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. फेब्रुवारी 2023 मध्ये हा विवाह पार पडलेला होता.
सदर प्रकार हा समोर आल्यानंतर मुलीच्या घरच्यांकडून मुलीच्या पतीला धमक्या देण्यास सुरुवात झालेली होती. मुलीच्या घरचे हे मुलाच्या घरी जाऊन तुला सोडणार नाही कापून टाकेल अशा स्वरूपाच्या त्यांनी अनेकदा धमक्या दिल्या अन अखेर त्यानंतर मुलाच्या वडिलांनी घोरपडी पोलीस चौकीत तक्रार केली आणि त्यासंदर्भात चौकशीसाठी मुलीच्या पालकांना बोलवण्यात आलेले होते त्यावेळी ही महिला देखील तिथे आलेली होती.
पोलीस चौकीत पोहोचल्यानंतर या महिलेने आम्हाला हे लग्न मान्य नाही असे म्हणत चौकीतच गोंधळ घालायला सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र त्यांचे वर्तन पाहिल्यानंतर त्यांना चौकीतून जाण्याचा सल्ला दिला मात्र आलेल्या महिलांनी आणखीनच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मुलीच्या आईने चौकीतच स्वतःचे कपडे काढले आणि पोलिसांना अडकवण्याची धमकी दिली. तुमच्यावर विनयभंगाची केस दाखल करील असे म्हणत तिने गोंधळ घातला त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले असून चौकशीला सुरुवात केलेली आहे.