पुण्यात पत्नीच्या गुप्तांगावर चक्क खलबत्ताने मारहाण ,इथचं तो थांबला नाही तर घाईघाईत शारिरीक संबंध ठेवुन अंगावर…
पुण्यात एक अत्यंत संतापजनक अशी घटना समोर आलेली असून कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका आरोपीने आपल्या पत्नीला जिवंतपणी नरक यातना दिलेल्या आहेत. पीडित पत्नीने पतीच्या विरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल केलेला असून पोलिसांनी तात्काळ या नराधम पतीला अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही तिच्या सोळा वर्षाच्या मुलीचा मोबाईल हातात घेऊन पाहत होती हे तिच्या पतीने पाहिले आणि त्याच्या मनात संशय निर्माण झाला. आपली पत्नी कोणासोबत तरी बोलत आहे याचा संशय आल्याने त्याने पत्नीला ओढून बेडरूममध्ये नेले आणि त्यानंतर तिला ओढणीच्या साह्याने बांधले आणि तिच्या अंगावर आणि गुप्तांगावर चटके दिले. आरोपी पतीने पत्नीचे हातपाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तिच्या डोक्यात हातापायावर आणि गुप्तांगावर खलबत्याने मारहाण केली.
आपल्यासोबत घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर पीडित महिलेने कसेबसे करून आपली सुटका करून घेतली आणि तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशन गाठले. तिथे गेल्यानंतर महिलेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.