बायको वेगवेगळ्या बाॅयफ्रेंडसोबत तब्बल ३५ वेळा पळुन गेली तरी पती लावतो जीव, म्हणतोय., माझी पत्नी कधीचं…
पुणे: पती-पत्नीचं नातं म्हटलं की रुसवे-फुगवे हे आलेच.अनेकदा पत्नी रागाने माहेरी देखील निघुन जाते.मात्र पुण्यात एक पत्नी गेल्या ५ वर्षात जवळपास 35 वेळा पळुन गेल्याची अजब घटना समोर आली आहे.एवढं असुनही भाबड्या पतीचं पत्नीवरचं प्रेम काही कमी झालेलं नाही.
पीडित पतीने आता बायकोला शोधण्यासाठी लोकांनाच आवाहन केलं आहे.पती आपल्या २ मुलांसह पत्नीचा शोध घेत फिरत आहे.कृष्ण मुरारी गुप्ता असं या पीडित पतीचं नाव आहे.पतीने याप्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली आहे.
कृष्ण मुरारीने पोलिसात तक्रार करताना म्हटलं आहे की,पत्नी 30 ते 35 वेळा पळुन गेली आहे.२ मुलं लहान आहेत.मोठा मुलगा ४ वर्षांचा आहे आणि लहान मुलगी ४ महिन्यांची आहे.पत्नी होती तर नोकरी करता येत होती.मात्र आता बायको गेल्याने नोकरीही करता येत नाहीये.त्यामुळे भीक मागण्याची वेळ माझ्यावर आली आहे.जर माझी पत्नी परत घऱी आली नाही तर माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळी येईल.
कृष्ण मुरारीने 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता.लग्नाच्या वर्षभरातच पत्नी पळुन गेली होती.त्यानंतरही अनेकदा पत्नी सोडुन गेली होती.प्रत्येकवेळी मध्यस्थी करुन तिला पुन्हा आणलं गेलं.मात्र यावेळी पत्नीचा शोध लागत नाहीये.बायको कुठे गेली याची माहिती देखील मिळत नाहीये,अस पती कृष्ण मुरारीने सांगितलं.