​पुण्यात माय-लेकाचा सोबतचं करुण अंत; २ मिनीटातचं मृत्यूने दोघांना कवटाळले

पुणे : बेल्हा-जेजुरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात माय-लेकासह अन्य एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.संकेत दिलीप डोके आणि विजया दिलीप डोके असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुला आणि आईचं नाव आहे.तर ओंकार चंद्रकांत सुक्रे(वय २०) या युवकानेही आपले प्राण गमावले आहेत.

विजया दिलीप डोके या आंबेगाव तालूक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या होत्या.त्या लवकरच सरपंचदेखील होणार होत्या.या ग्रामपंचातीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने विजया डोके या सरपंचपदावर विराजमान लवकरचं होणार होत्या.

मात्र एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं.मुलगा आणि आईने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने डोके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संकेत डोके आणि ओंकार सुक्रे हे दोघेही लहानपणापासुन जीवलग मित्र होते.पूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सोबत चालले होते.तरुण पोरांच्या अपघाती मृत्यूने मित्र परिवार शोकसागरात बुडाला असुन जग बघायच्या आतच २ तरुणांवर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?
धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळील वळणावर शिक्रापुरच्या बाजूने आलेल्या MH.14.GU.6880 या टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात तिघेही जागीच गतप्राण झाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *