पुण्यात माॅलमध्ये तरुणीच्या ‘प्रायव्हेट पार्ट‘ चे मोबाईमध्ये शूटिंग केले, लैंगिक सुखासाठी तो…

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून नगर रोडवरील एका प्रसिद्ध मॉलमध्ये ही घटना समोर आलेली आहे. एका वीस वर्षीय तरुणीच्या प्रायव्हेट पार्टचे मोबाईल मधून शूटिंग केल्याचा हा प्रकार समोर आलेला असून विमाननगर परिसरातील ही घटना आहे. परिसरातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये ही तरुणी खरेदी खरेदीसाठी आलेली होती त्यावेळी ही घटना घडलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे

उपलब्ध माहितीनुसार, अमीर अश्फाक अहमद ( वय 32 राहणार मयूर किलबिल सोसायटी धानोरी ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात वीस वर्षीय तरुणीने विमान नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. सदर तरुणी ही तिच्या मित्रासोबत रविवारी रात्री नऊच्या सुमारास खरेदी करण्यासाठी आलेली होती त्यावेळी ती खरेदी करत असताना आरोपी तरुण हा तिच्या प्रायव्हेट पार्टसह इतर अवयवांचे मोबाईलमध्ये शूटिंग काढत होता.

तरुणीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ तिने त्याला जाबी विचारला आणि त्यानंतर याप्रकरणी व्यवस्थापन विभागाने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला त्यावेळी हा प्रकार समोर आला. आरोपीने लैंगिक समाधान मिळवण्यासाठी तिचे चित्रीकरण केल्याचे समोर आलेले असून पोलिसांनी आरोपी अमीर याला अटक केली असून सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *