पुण्यात लग्नाला ८ महिने झाले तरी नवरा जवळ झोपांना अन् भांडा फुटल्यावर नवरी उडालीचं

पुणे : लग्न होऊन ८ महिने झाले तरीही नवरा बायकोच्या जवळ झोपण्याऐवजी दुर जाऊन झोपत होता बायकोने विचारल्यानंतर मला सेक्स करण्याची इच्छा होत नाही असं सांगायचा.लग्नाच्या ८ महिन्यानंतर तिला आपला नवरा शरीरसंबंध ठेवण्यासाठी असमर्थ असल्याचे कळाले अन् तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

अखेर तिने आपली फसवणुक झाल्याची तक्रार ठाण्यात दिली.चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पतीसह सासु-सासरे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ३० वर्षाची आहे.जून 2022 मध्ये तिचा पुण्यातील एका तरुणासोबत लग्न झाल होतं.विवाहनंतर लग्नाच्या पहिल्या रात्री तिचा पती जवळ झोपला नाही.दुर अंतरावर जाऊन तो झोपला.लग्नाच्या ८ महिन्यानंतर हीच परिस्थिती होती.त्यामुळे या महिलेला शंका आली.तिने अधिक चौकशी केली असता तिचा पती शारिरीक संबंध ठेवण्यास अपात्र असल्याचे कळाले.

याबाबत पत्नीने कुठेही वाचता करू नये यासाठी तिला वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण केली.इतकेच नाही तर धमकी देऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अखेर या पिडीतेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *