पुण्यात वहिनीला बेल्टने मारत दीडशे उठाबशा काढायला लावल्या , पती बघ्याच्या भूमिकेत

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका विवाहित महिलेचा सासरी छळ करण्यात आलेला आहे. लहान लहान गोष्टीवरून तिला लग्न झाल्यापासून चक्क बेल्टने मारहाण करण्यात येत होती. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या दिराने तिला जबरदस्तीने दीडशे उठाबशा काढायला लावल्या आणि पतीने देखील या प्रकारात त्याला साथ दिलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार, 26 डिसेंबर 2021 रोजी पासून तर नऊ एप्रिल 2023 पर्यंत हा प्रकार वारंवार पिंपरीतील आदर्श नगर येथे घडत होता. महिलेने यानंतर देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेले असून पोलिसांनी आरोपी पती दीर आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झाल्यापासून आरोपीने सातत्याने आपल्यासोबत वाद घातले आणि आपल्याला लाथा बुक्क्यांनी तसेच कमरेच्या बेल्टने मारले. वरील आरोपींनी आपला गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला तसेच सातत्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. आरोपी दिराने जबरदस्ती करत आपल्याला 150 उठाबशा काढायला लावल्या असे देखील फिर्यादीत म्हटलेले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *