पुण्यात शेजारच्या जोडप्यांचा सेल्फी स्टीकच्या साह्याने सेक्स व्हिडीओ बनवला अन् नंतर…

पुणे – शेजारी रहाणाया विवाहित जोडप्याचा एकांतातील संबंध ठेवतांनाचा व्हिडीओ सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमेयामध्ये शुट केल्याची घटना पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे.गंभीर बाब म्हणजे आरोपी या अश्लिल व्हिडीओची धमकी देऊन महिलेला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करीत होता.कुंदन अष्टे असे आरोपीचे नाव असुन तो एका मोठया कंस्ट्रक्शन कंपनीत प्लानिक मॅनेजर पदावर जाॅबला असल्याची माहिती समोर आली आहे.पुणे-बंगळुरु महामार्गावरील उच्चश्रुंचीवस्ती असलेल्या गृहनिर्माण सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला.

24 फ्रेब्रुवारीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत जोडप्याने हिंजवडी पोलीस स्थानकात कुंदन अष्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.आरोपीने सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइलच्या कॅमेरात बेडरुममधील सेक्स करतांनाचे रेकॉर्डिंग केले.मागच्या ३ महिन्यांपासुन हा प्रकार सुरु होता असा आरोप त्यांनी केला.कुंदनने संबंधित महिलेच्या मोबाइलवर हे व्हिडीओ पाठवले व तिच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली.

माझी मागणी मान्य केली नाही तर सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे.मोबाइलवर आलेले हे व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेला तर धक्काच बसला.तिने धीर एकवटुन पतीला याबद्दल सांगितलं.त्यानंतर पती-पत्नीने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवले.गेल्या आठवडयात हे जोडपे त्यांच्या रुममध्ये असताना त्यांना खिडकीजवळ काहीतरी हालचाल होताना जाणवली.ते खिडकीजवळ गेले असता त्यांना कुंदन अष्टे दिसला.

त्याने हातात पकडलेल्या सेल्फी स्टिकला मोबाइल फोन लावलेला होता.त्यानंतर या सर्व व्हिडीओमागे कुंदन अष्टे असल्याचे समजले.दुसयाच दिवशी सोसायटीची मीटिंग भरवण्यात आली.या सभेमध्ये अष्टेला लोकांनी धारेवर धरले.त्यावेळी अखेर कुंदनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली.३ महिन्यापासुन हा सर्व प्रकार सुरु असल्याचे त्याने मान्य केले.महिलांकडुन शरीरसुख मिळवण्यासाठी हे सर्व केल्याचे कुंदनने सांगितले.

हिंजवडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रंगनाथ मानके यांनी हि माहिती दिली.कुंदन अष्टेच्या कृत्याने रहिवाशांनाच नव्हे तर तो ज्या कंस्ट्रक्शन कंपनीत नोकरीला आहे त्यांनाही मोठा धक्का बसलायं.इंजिनिअरचा पदवीधर असलेला कुंदन मुळचा सोलापूरचा आहे.कुंदनचा 2013 साली विवाह झाला असुन, त्याला ५ महिन्यांची मुलगी आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *