पुण्यात शेजारील ८ वर्षीय मुलाला आधी पाॅर्न व्हिडिओ दाखवला नंतर त्याचे कपडे काढत…
Pune News : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यासोबत तीन तरुणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून हा सर्व प्रकार घडत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही तरुणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
संतोष शिंदे (वय 21), महेश माळवे (वय 19) आणि किरण सावंत (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भादवी 376 (ड), 377, 506 (2), पोक्सो क 3 (ए) यासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांच्या आठ वर्षीय मुलाला आरोपी संतोष याने विमलची पुडी आणण्याच्या बाहण्याने आरोपीने बोलून घेतले. त्यानंतर त्याला पर्वती दर्शन येथील आपल्या घरी नेले. (Pune Crime News)
त्यानंतर अश्लील व्हिडिओ दाखवत त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ घरच्यांना दाखवण्याची धमकी देत सलग दोन महिने त्याच्यासोबत आरोपी अनैसर्गिक अत्याचार करत राहिले. या घटनेचा दत्तवाडी पोलीस (Pune Police) अधिक तपास करत आहेत.