पुण्यात स्वत:च्याचं मुलीला बाॅयफ्रेंड बनुन करायची मेसेज, कारण कळताचं लेकीचे उडाले हौश

पुणे- ऑनलाइन आणि माहिती तंत्रज्ञानाने ज्या सोप्या गोष्टी निर्माण केल्या आहेत,त्यात बर्यांच वेळा त्याचे तोटेही उघडं झालेत.काल पुण्यात एका महिलेला अटक करण्यात आली.या महिलेवर गेल्या १ वर्षापासुन स्वतःच्या मुलीचा छळ केल्याचा आरोप होता.ती आपल्या मुलीचा बाॅयफ्रेंड म्हणुन मेसेज करत होती.दरम्यान आईनेही हे सगळं मान्य केलंय.हि अतिशय हैराण करणारी बाब आहे.

वास्तविक हि घटना पुण्यातील डेक्कन भागातील आहे.माहितीनुसार,आरोपी महिला 42 वर्षांची असुन तिचे नाव सनि पटेल आहे.या आईवर स्वतःच्या मुलीला ऑनलाइन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.मुलगी भीतीपोटी ना आपल्या कुंटुबियांना ही गोष्ट सांगत होती ना कोणत्याही मैत्रिणीला सांगत होती.शेवटी तिने हि गोष्ट तिच्या आईला सांगितली.

या तरुणीने जेव्हा आपल्या आईला सांगितलं तेव्हा तिच्या आईनेसुद्धा आपण काही न केल्याचं भासवलं.आपण पोलिसांकडे तक्रार करूयात असं म्हणत दोघींनी पोलीस स्टेशन गाठलं,सगळा किस्सा पोलिसांना सांगितला.

सुरुवातीला यात मुलीच्या आईचाच हात आहे,याचा विचार पोलिसांनाही केला नव्हता.पण तपास सुरू झाल्यावर हळुहळु हे प्रकरण उघडलं गेलं.मुलीने जेव्हा कळालं कि हे सर्व तिच्या आईने केले आहे,तेव्हा तिला आधी विश्वास बसला नाही,मग नंतर आईने हा पराक्रम स्वीकारला.तिने असे का केले याचे कारणही त्यानी सांगितले.

गेल्या १ वर्षापासुन आपण हे करत असल्याचंही आरोपी आईने सांगितलं आणि एक अतिशय विचित्र कारण सांगितलं.ती म्हणाली की,मुलगी इतर तरुणाचा बळी पडु नये म्हणुन ती तिला या गोंधळात टाकत असे.सध्या आरोपी आईला अटक करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *