पुण्यात १७ वर्षीय मुलीने आईच्या मदतीने चक्क वडिलांना पेट्रोल टाकुन जाळलं; कारण तर विचारुचं नका

पुणे : पुण्यात (Pune Crime) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. प्रेमप्रकरणातूनही अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. अशातच पु्ण्यात (Pune News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेम संबंधास विरोध करणाऱ्या वडिलांचा अल्पवयीन मुलीनं तिचा प्रियकर आणि आईच्या मदतीनं निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आलीय. पुणे पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि आईला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

जॉन्सन लोबो असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, मुलीची आई सॅन्ड्रा जॉन्सन लोबो आणि आणि तिचा प्रियकर जॉय कसबे यांना अटक केली आहे. वडगावशेरीमध्ये 30 मेच्या रात्री 11.30 खून करण्यात आला. त्यांनतर 31 मे रोजी रात्री मृतदेह सणसवाडी परिसरात नेऊन टाकण्यात आला होता. सणसवाडी परिसरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला होता. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

त्यानंतर सीसीटिव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला. विशेष म्हणजे गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृताची पत्नी सॅन्ड्रा हिने स्वतःच पतीच्या मोबाईलवर तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचं स्टेटस ठेवलं होतं. त्याचप्रमाणे त्याला स्वतःच्या मोबाईल वरून थँक्यू असा मेसेज देखील पाठवला होता.

पत्नीने केली पतीची हत्या
दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात पत्नीनेच पतीचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या मावळमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला होता. रविवारी मावळमधील गहुंजे येथे एका विवाहित तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करत हत्या केल्याची माहिती समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांतच आरोपीचा शोध लावला आहे. पत्नीनेच पतीची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे.

पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पत्नीने रविवारी पतीला माहेरी नेतान घरातील चाकू सोबत घेतला होता. त्यानंतर माहेरी पोहोचल्यानंतर दोघेही शेतात पोहोचली. त्यावेळी पत्नीने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केली अन् ती त्याच्या नजरेआड झाली. त्यानंतर मागून येऊन पत्नीने पतीचा गळा चिरला आणि त्याची निर्घृण हत्या केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *