पुण्यात ३३ वर्षाची बायको फुल टल्ली, मुलींना मारहाण करत होती अन् पतीलाही बेदम मारहाण

आत्तापर्यंत आपण अनेकदा दारू पिऊन नवर्याने मारहाण केल्याची प्रकरणे ऐकले असतील,मात्र मुंबईतील मिरा रोड येथुन एक गजबचं प्रकरण समोर आणले असुन दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका बायकोने पतीला आणि तिच्या मुलींना बेदम मारहाण केलेली आहे.याआधी देखील तिने अशीचं मारहाण केली आहे.मात्र अखेर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,निम्मयी बाहुर(वय 39) असे तक्रारदार पतीचे नाव असुन ते भाईंदर पूर्व येथे त्यांची बायको सुदेशना(वय 33) आणि त्यांच्या मुलींसोबत राहतात.मुंबईच्या जवेरी बाजारात ते दागिने बनवण्याचे काम करत असुन मागील ८ वर्षापासुन त्यांच्या बायकोला दारूचे व्यसन जडलेले आहे.तिचे हे व्यसन सोडवण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले मात्र त्यांचा काहीचं उपयोग झाला नाही.

त्यांचा जोडीदार असलेला अमोल माहेती यांनी त्यांना काॅल करून तुमची पत्नी खुप दारू प्यालेली आहे.दारूच्या नशेत ति तुमच्या मुलींना मारहाणसुध्दा करत आहे असे अमोलने सांगितले.हे ऐकताचं तात्काळ बाहुर यांनी घरी धाव घेतली.त्यावेळी त्यांच्या बायकोवर दारूचा पुर्णपणे अंमल चढलेला होता.

घरी पोहोचल्यानंतर मद्यधुंद बायकोनी त्याला देखील बेदम मारहाण केली आणि त्यानंतर मुलीनी त्यांना आईने मारहाण केल्याचा video देखील दाखवला.हतबल झालेला नवरा त्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन दवाखान्यात पोहोचला आणि तिथे त्यांच्यावर उपचार केले.त्यानंतर पोलिस ठाणे गाठतं त्यांनी पत्नीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *