पुण्याला कामाला जातो सांगुन औरंगाबादचा तरुण किन्नरसोबत रहायचा अन् पुढं किन्नरनी त्याचासोबत भयंकरचं केलं

औरंगाबाद : तृतीयपंथी मित्र लग्नासाठी तगादा लावुन सतत पैसे उकळण्याची मागणी करुन त्रास देत होता.तसेच तृतीयपंथी लोक घरी आणुन समाजात बदनामी करेल,अशी धमकी देखील एका तरुणाला देत होता.या सर्व त्रासाला कंटाळुन २९ वर्षीय युवकानं एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे.हि धक्कादायक घटना रांजणगाव येथे घडली.सागर बाबुराव कोंगळे वय -२९(गारखेडा) असे मयताचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,सागर हा वाळुज औद्योगिक परिसरातील एका कंपनीत कामाला होता.काही दिवसापुर्वी तो एका हॉटेलमध्ये ज्यूस पीत असताना त्याची ओळख एका तृतीयपंथीया इसमासोबत झाली.त्यानंतर दोघात मैत्री झाली व पुढे प्रेम संबंध निर्माण झाले.त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासुन सागर हा घरी मुकुंदवाडी येथे न राहता रांजणगाव येथे राहत होता.

सागरने पुण्याला नोकरीला जात असल्याचे घरच्यांना खोटे सांगितले.मात्र तो पुण्यात न जाता रांजणगाव येथे राहत होता.सुरुवातीला काही दिवस तृतीयपंथी सागर सोबत चांगला वागला,मात्र थोड्यादिवसानंतर तो सागरकडे पैशाची मागणी करायला लागला.त्यामुळे सागरने त्याला वेळोवेळी पैसे दिले.हजारो रुपये दिल्यानंतर देखील त्याची पैशाची मागणी वाढतच होती.तसेच काही दिवसापासुन तो सागरकडे लग्नासाठी तगादा लावत होता.

सागर लग्नाला नकार देत होता.त्यामुळे तृतीयपंथीयाकडून ‘तु लग्न कर नाहीतर माझ्या मित्रांना घेऊन तुझ्या घरी येऊन गोंधळ घालुन तुझी बदनामी करीन’अशी धमकी देत होता.त्यामुळे सागर गेल्या काही दिवसापासुन टेंशनमध्ये होता.सागरने रविवारी रात्री एक चिठ्ठी लिहुन तृतीयपंथियाच्याच घरी सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेतला.

हा प्रकार लक्षात आल्यावर तृतीयपंथी व साथीदाराने सागरला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असताना रात्री १० वाजता मृत्यू झाला.याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *