पुतणीचं लग्न सोडून कर्तव्यावर परतला, २२ वर्षांच्या जवानाला वीरमरण, ऊसतोड मजूर मायबाप कोलमडले

बीड: केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश नरसु मिसाळ यांना अपघातात वीरमरण आले. राजस्थानमधील सुरतगड येथे परेडला जाताना भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून सोमवारी सकाळी ते शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी नऊ वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेश मिसाळ यांनी देश सेवा करण्याचं स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगलं होतं. यासाठी अथक मेहनत देखील त्यांनी केली. या मेहनतीने त्यांना यश देखील आलं.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी असलेले उमेश मिसाळ (वय २२ वर्ष) हे अवघ्या दोन वर्षांपूर्वीच पंचवीस मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते.उमेश यांचे आई-वडील हे ऊसतोड कामगार आहेत. उमेशची सैन्यात भरती आणि यश पाहून आमच्या मुलाने आमचे पांग फेडले, अशा भावना ते नेहमी व्यक्त करायचे.

उमेश मिसाळ यांचा अवघ्या सहा महिन्यापूर्वीच केकानवाडी येथील प्रतीक्षा यांच्याशी विवाह झाला होता. उमेश हे पंधरा दिवसांपूर्वीच पुतणीच्या लग्नासाठी गावी आले होते. परंतु हळदीच्या दिवशी त्यांना मराठा बटालियनमध्ये तातडीने हजर राहण्याचे आदेश आले. यामुळे पुतणीचे लग्न सोडून देशसेवेसाठी ते सुरतगड राजस्थानकडे त्याच दिवशी रवाना झाले.मोरवणे गावचे सुपुत्र शहीद अजय ढगळे पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलीने दिला मुखाग्नी

दुर्दैवाने नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. उमेश हे बटालियनमध्ये पोहोचले, मात्र सोमवारी सकाळी परेडसाठी जाताना भूमिगत वीज वाहिनीतून त्यांना तीव्र धक्का बसला. सेवेत असतानाच ते शहीद झाले.ही वार्ता जशीच गावात आली तशी ती वाऱ्यासारखी गावभर पसरली. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.छोट्या नातवाचा काय गुन्हा? संतोष शिंदेंच्या मातोश्रींचा हंबरडा, हसन मुश्रीफांना अश्रू अनावर

उमेश मिसाळ यांच्या पार्थिवावर कोल्हेवाडी येथे त्यांच्या गावातच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तहसीलदार एम.जी. खंडागळे यांनी दिली आहे. मात्र अवघ्या २२ वर्षांचा वीर जवान कर्तव्यावर असताना शहीद झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *