पेपर लिहितांना अचानक हात-पाय वाकडे, कळुपर्यंत चिमुरडीने सोडला जीव; पंढरपुरात ह्रदयद्रावक घटना समोर

पंढरपूर : पंढरपुरमधुन एक हादरवणारी घटना समोर आली आहे.पंढरपुरच्या अरिहंत स्कुलमधील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेली हि घटना आहे.इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी अनन्या भादुले(वय 9) वर्गामध्ये पेपर लिहीत होती.यावेळी अचानक झटका आल्याने जागीच गतप्राण झाली आहे.दरम्यान तिला अचानक असे काय झाले हे न समजल्याने वर्गात काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते.शिक्षकांनी तातडीने उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहिर केले.

इयत्ता तिसरी मधील अनन्या भादुले(वय 9) वर्गामध्ये पेपर लिहीत होती.यावेळी अचानक झटका आल्याने तिना जागीच जीव सोडला.घाबरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तात्काळ उपचारासाठी हलविले मात्र उपचार करण्यापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता.प्राथमिक माहितीनुसार अनन्याला ब्रेन हैम्रेज झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.भेदरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले मात्र उपचार सुरु होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.

पंढरपुरच्या अरिहंत इंग्लिश स्कुल मधील हि दुर्दैवी घटना आहे.काल गुरुवार दि. 19 जानेवारी रोजी अनन्या सकाळी 8 वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली.आज मराठीचा पेपर होता.अनन्याने संपुर्ण पेपर सोडविला.पेपर सुटायला काही वेळांचा अवधी असताना अनन्याला झटका आला.त्यात तिने हातपाय वाकडे केले.

तिची अवस्था पाहुन शिक्षकांनी तिला उचलुन उपचारासाठी रुग्णालयात हालविले.मात्र उपयोग झाला नाही.रिपोर्टनुसार,अनन्या ची तब्येत गेल्या २ दिवसांपासुन ठीक नव्हती.तिला ताप देखील येत होता असे समजते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *