|

‘पोराचा चेहरा माझ्यासारखा का दिसत नाही?; पुण्यात पतीला संशय अन् परिसर हादरला

मुंबई : देशाची आर्धिक राजधानी असलेल्या मुंबईत एका वडिलांनी आपल्या चिमुकल्या मुलाची आणि बायकोची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.एका मुलाची हत्या केली आता ४ वर्षांचा दुसरा मुलगा वडिलांविरोधात साक्ष देणार आहे.

मुंबईच्या शकरपूर भागात शुक्रवारी एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि १.५ वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे.हत्येनंतर तो ४ तास तसाच मृतदेहाजवळ बसुन होता.आरोपी पती त्याच्या पत्नीवर चारित्र्यावरुन नेहमी संशय घेत होता.आता आरोपीचा दुसरा ४ वर्षांचा मुलगा वडिलांविरोधात साक्ष देणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,आरोपी ब्रिजेश आपल्या कुटुंबासोबत शकरपूरमध्ये मजुरीचं काम करायचा.त्याने २४ वर्षीय पत्नी आणि १.५ वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या केली.पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहांशेजारी बसुन होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेतली.ब्रिजेशने २०१६ मध्ये महिलेशी लग्न केलं होतं.त्यांना एक ४ वर्षांचा आणि १.५ दीड वर्षांचा मुलगा होता.आरोपी ब्रिजेशचा बायकोवर तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.याच रागातुन त्याने पत्नीला संपवल.

ब्रिजेश बल्ब होल्डरमध्ये पिन लावण्याचं आणि पॅकिंगचं काम करतो.मिळालेल्या माहितीनुसार,ब्रिजेशचा त्याचा बायकोवर संशय होता.तसंच दीड वर्षांचा मुलगा त्याचा नसल्याचा त्याला संशय होता.त्यांच्या १.५ वर्षाच्या लहान मुलाचा चेहरा त्याच्या चेहऱ्याशी जुळत नाही याच संशयावरुन त्याने माय-लेकाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

२ दिवसांपूर्वी ब्रिजेशचं त्याच्या पत्नीसोबत रात्री दोनच्या सुमारास मोठ भांडण झालं होतं.त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली.त्यांचं हे भांडण वाढत गेलं आणि ब्रिजेशने बायकोचा स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापुन हत्या केली.त्याचं वेळी त्यांचा १.५ वर्षांचा मुलगा झोपेतुन उठला आणि रडू लागला.आरोपीने चिमुकल्याचाही गळा कापुन हत्या केली.

त्यानंतर त्याने पोलिसांना कॉल करुन स्वत: डबल मर्डरबाबत कळवलं.पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पत्नी आणि चिमुरडा खाली मृतावस्थेत पडलेले होते.पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत दोघांनी जीव सोडला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *