पोलिस इन्स्पेक्टरचे हवालदारासोबत समलैंगिक संबंध, ड्युटीवरुन सुटताचं खोली गाठायचे अन् शेवटी झोपचं उडाली
नागौर : प्रेम कधी, कुठे आणि कुणाशी होईल याचा नेम नाही. प्रेमाला कोणतं बंधन नसतं असं म्हणतात. मात्र हेच प्रेम कधीकधी डोकेदुखी बनू शकत. याची अनेक उदाहरणं तुम्ही वाचली, पाहिली असतील. असंच एक प्रेम प्रकरण राजस्थानातून समोर आलं आहे. यामध्ये पोलीस इन्स्पेक्टरचा जीव पोलीस कॉन्स्टेबलवर जडला. मात्र पुढे जे झालं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथील समलैंगिक संबंधांचं हे प्रकरण आहे. पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस इन्स्पेक्टर यांनी एकमेकांच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले. सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती.अनेकदा दोघांनी न्यूड फोन कॉल केले. एकांतात दोघांनी शारीरिक संबंधही बनवले. दोघेही जवळपास आठ महिने या नात्यात होते. यानंतर 32 वर्षीय हवालदाराने 57 वर्षीय ठाणेदाराला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
कॉन्स्टेबलने काही खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केले होते, याद्वारे त्याने इन्स्पेक्टरकडून अडीच लाख रुपये उकळले. मात्र त्याला आणखी पैशांचा लोभ होता. यातून त्याने पुन्हा पाच लाख रुपये आणि आलिशान कारची मागणी केली.मागणी पूर्ण न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. मात्र ब्लॅकमेलिंगकला कंटाळून इन्स्पेक्टरने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी दोघांनाही निलंबित केलं.
दोन मैत्रिणी लग्नासाठी पळून गेल्या
राजस्थानातील दोन मुलींच्या प्रेमकहाणीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. दोघांनाही एकमेकांशी लग्न करून पती-पत्नीप्रमाणे राहायचे होते.अजमेर शहरातील रहिवासी असलेल्या या दोन्ही मुली एकाच सोसायटीतील होत्या.
एक मुलगी 21 वर्षांची तर दुसरी 20 वर्षांची आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली.तेव्हापासून ते एकमेकांच्या घरी ये-जा करू लागल्या.दोघींमधील प्रेम इतकं वाढलं की त्या लग्न करण्यसाठी घरातून पळून गेल्या आहेत.