पोलिस होण्याचे स्‍वप्‍न बाळगणार्या जळगावच्या तरुणाचा मुंबईत दुख:द अंत, १ वर्षाचा चिमुरड्यावरचा बापाचा हाथ गेला

तोंडापूर (जळगाव) : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या येथील तरुणाचा (Mumbai) मुंबईला रात्री अकराच्या सुमारास (Railway) रेल्वेतून पडून मृत्यू झाला. स्वप्नील राजू पाटील (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

स्वप्नील पाटील हा मुंबई येथे पोलिस भरती प्रकियेसाठी गेला होता. भरतीची प्रक्रीया पूर्ण करून स्‍वप्‍नील मंगळवारी दुपारी रेल्वेने घराकडे निघाला होता. खर्डी येथे अचानक त्याचा चालत्या रेल्वेतून तोल गेल्याने तो खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

आई– वडीलांचा एकुलता एक
रेल्वे पोलिसांनी सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून बुधवारी (ता. १२) सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिला. आई– वडिलांचा एकुलता एक विवाहित मुलगा आहे. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. (Jalgaon News) त्याच्या पश्चात पत्नी नीलिमा, मुलगा पीयूष, आई– वडिल, काका असा परिवार आहे. पोलिस भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मुत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *