पोलीसाकडून शिक्षिका महिलेवर ‘ वेळोवेळी ‘ ,चक्क गोळ्या आणून द्यायचा…पण गर्भवती शिक्षिकेने एकदा”,…
महाराष्ट्र पुणे येथे एक धक्कादायक घटना समोर आलेली असून पोलीस कर्मचारी असलेल्या व्यक्तीने एका शिक्षिका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पुढे त्यातून ती गर्भवती होताच त्याने चक्क गोळ्या खाऊ घालून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पीडित महिलेने गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. भोसरी, साखरेवस्ती आणि हिंजवडी फेज एक येथे ऑक्टोबर २०२० ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
आकाश प्रकाश पांढरे (वय ३०, रा. रावेत), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून तो पिंपरी-चिंचवड शहर दलात कार्यरत आहे .पीडित २८ वर्षीय महिलेने २६ फेब्रुवारी रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
फिर्यादी महिला ही शिक्षिका असून तिच्या मुली सोबत राहते. ती एकटी राहात असल्याने आरोपीने तिच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक जबरदस्ती केली तसेच अनैसर्गिक पद्धतीने देखील संबंध ठेवले त्यातून ती महिला गर्भवती झाली आणि आरोपीने तिचा गर्भपातही करून आणला.
फिर्यादी पीडित महिला ही लेक्चरर म्हणून नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवत असून तिच्या मुलीसोबत राहते. ती एकटी असल्याचा पांढरे याने गैरफायदा घेत आपण पोलीस असल्याचे सांगत तिला जाळ्यात ओढले आणि वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. ती गर्भवती होताच गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात देखील घडवून आणला आणि त्यानंतर ‘ तू एकटी कशी राहतेस बघतो ‘, असे म्हणून फिर्यादी महिलेला धमकी दिली. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असून आकाश पांढरे याच्या कृत्याने पोलीस दलात खळबळ उडालेली आहे.