प्रसिध्द हाॅटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय.,एकाच रुममध्ये ३ काॅलेजचे जोडपे करेक्ट टाईमावर धरली

यवतमाळ : देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरुन यवतमाळमधील अवधुतवाडी पोलिसांनी एका प्रसिद्ध हॉटेलवर धाड टाकली. यावेळी एका तरुणीसह कमिशनवर देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हॉटेलमधील मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवार १७ एप्रिलला दुपारच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी हॉटेल मालक जय वाधवानी आणि हॉटेलमधील मॅनेजर शिवम पवार या दोघांवर अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यवतमाळ शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या सुप्रसिद्ध ग्यानसन हॉटेलमध्ये शिवम पवार हा कर्मचारी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करीत असल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर हॉटेल बुक करुन ग्राहक पुरवून देहव्यापार करुन घेत असल्याचाही दावा केला जात आहे. याबाबतची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे यांना मिळाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपनिरीक्षक खाडे यांनी याबाबत ठाणेदार मनोज केदारे यांना माहिती दिली. त्यावरून सोमवारी पोलिस ठाण्यातील अधिकारी, महिला व पुरूष कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले. दरम्यान एक बनावट ग्राहक तयार करून हॉटेलमधील कर्मचारी शिवम याच्यासोबत व्हॉट्सअॅप आणि फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. यावेळी कर्मचारी शिवमने त्या बनावट ग्राहकाच्या मोबाईलवर मुलींचे फोटो पाठविले.

त्यानंतर बनावट ग्राहकाने मुलीची मागणी केली असता, कर्मचारी शिवम याने हॉटेल ग्यानसन येथे मुलगी उपलब्ध करून देतो असे सांगितले. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित बनावट ग्राहकाला योग्य त्या सूचना देऊन हॉटेलमध्ये पाठविले. काही वेळानंतर बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यावरून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा त्या ठिकाणी धडकला. यावेळी हॉटेलमधील रिसेप्शनिस्ट कर्मचाऱ्यांना रूम नंबर ११० बाबत विचारणा करत ती रूम तपासण्यात आली असता, रूममधील बेडवर एक तरुणी आढळून आली.

या प्रकरणी तरुणीसह कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत हॉटेलमधील कर्मचाऱ्यासह मालकावर अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ही कारवाई ठाणेदार मनोज केदारे, पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे, गजानन दुधकोहळे, नितीन सलाम, सुरज शिंदे, प्रशांत राठोड, अविनाश ढोणे, बबलु पठाण, गणेश यांच्यासह महिला कर्मचारी मडावी यांनी पार पाडली.

तीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
अवधुतवाडी पोलिसांनी हॉटेल ग्यानसन येथे छापा टाकला. यावेळी काही रुममध्ये तीन महाविद्यालयीन प्रेमी युगुल पोलिसांना आढळून आले. या तीन मुली आणि तीन मुलांना पोलिसांनी अवधुतवाडी ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांची चौकशी करीत सूचनापत्र देऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. यापूर्वी याच हॉटेलमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार करण्यात आला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *