प्रेमाचा शेवट, प्रियकर-प्रियसीना ट्रेन येताचं स्वत:ला दिलं रेल्वेखाली झोकुन; पण प्रियकरानी स्टेटसवर आधी…
अंबरनाथ : प्रियकर आणि प्रेयसीने ट्रेन खाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वेखाली शुक्रवारी रात्री उडी घेत या जोडप्याने आपलं जीवन संपवलं.
अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात हे दोघे वास्तव्यास होते. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्टेटसवर सदर तरुणाने स्वत:लाच श्रद्धांजली वाहिली असल्याची माहिती आहे.
रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही. या दोघांच्या आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या भागात शोककळा पसरली आहे.दरम्यान, प्रेम प्रकरणातून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचं प्रमाण अलिकडील काळात वाढत चाललं आहे. याला कौटुंबिक विरोध किंवा अंतर्गत सामंजस्याचा अभाव यांसारखे घटक कारणीभूत ठरत असल्याचं अनेकवेळा पाहायला मिळतं. मात्र अशावेळी आयुष्याचा शेवट करण्याच्या निर्णय घेण्यापेक्षा अधिकाधिक संवाद साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.