प्रेमाच्या जाळ्यात ओढुन वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले अन्… फेसबुक लाईव्ह करत नागपूरच्या तरुणाची नदीत उडी
Nagpur Crime News: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ५ लाखांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी मिळाल्याने एका तरुणाने थेट नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. रामपाल यादव असं मृत तरुणाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी रामपालने फेसबुक लाईव्ह करत आपबिती सांगितली. (Latest Marathi News)
याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकाच कुटुंबातील तिघांसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस स्टेशच्या हद्दीत राहणाऱ्या रामपाल यादव या तरुणाचे एका १९ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
दोघांमध्ये अनेकदा मनोमिलन देखील झाले. मात्र, काही दिवसानंतर दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना कळाली. त्यांनी मनीषला वारंवार फोन करत धमकावलं. इतकंच नाही, तर ५ लाख रुपये दे अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात (Crime News) अडकवू अशी धमकी सुद्धा तरुणीच्या कुटुंबियांनी मनीषला दिली.
दरम्यान, सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर मनीषने आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्याने फेसबुक लाईव्ह करत आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर मनीषने बुधवारी नदीपात्रात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांसह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांंना अटक केली आहे.