फोन उचलण्याची घाई जीवावर बेतली; पुण्यातील 21 वर्षीय अनुष्काला नाहक जीव गमवावा लागला

Pune News: सध्याच्या तरुणाईल मोबाईल फोनचं वेड किती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मोबाईल फोनमध्ये अनेकजण इतके व्यस्त असतात की आपल्या आजूबाजूच्या घडत असलेल्या गोष्टींचा अंदाजही त्यांना येत नाही. (woman died after falling from 5th floor) मोबाईलच्या नादात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहे. असाच एक प्रकार आता पुण्यातील सासवड परिसरात समोर आला आहे. मोबाईल फोनच्या नादात एका तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.

अनुष्का जगताप असं मृत मुलीचं नाव आहे. अनुष्का कुटुंबियांसह नवीन बांधकामाची पाहणी करण्यासाठी सासवड परिसरात गेली होती. तिथे पाहणी करत असताना अचानक अनुष्काला एक फोन आला. फोन उचलण्याच्या नादात अनुष्काचा पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 2 तारखेला ही घटना घडली होती. (Latest Marathi News)

अपघातानंतर अनुष्का गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यात अनुष्काची प्राणज्योत मालवली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *