फ्रॅक्चर पायाला प्लास्टर करून भारतात आला, विमानतळावर पोलिसांनी प्लास्टर काढताचं प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या
मुंबई : दुबईतून फ्रॅक्चर पायाला प्लॅस्टर करून एक व्यक्ती भारतात दाखल झाला. पण त्याला विमानतळावरच रोखलं गेलं. त्यानंतर पुढे काय झालं हे ऐकून तुम्ही देखील आवाक् व्हाल. फ्रॅक्चर पायाचं प्लास्टर काढलं जाताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. हे प्लास्टर काढणारा डॉक्टर नाही तर तो पोलीस आहे. तुफान व्हायरल झालेल्या या फ्रॅक्टरचं जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा पोलिसंही हैराण झालं.
कारण या फ्रॅक्चर पायातून सोनं निघालं. भारतात कधी डोक्याच्या वीग मधून, कधी चॉकलेट तर कधी बॅगच्या रॉडमधून तर कधी शरिरावरील सर्जरीतूनही सोन्याची तस्करी झाल्याचे समोर आले आहे. आपण कल्पना करून शकत नाही अशा बेकायदेशीररित्या सोन्याची तस्करी होऊन सोन्याची विक्री भारतात होते.
सोनं असो की दारू याच्या तस्करीचे तुम्ही कित्येक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ सर्वांना अवाक् करणारा आहे. फ्रॅक्चर पायाच्या प्लास्टरमधून तब्बल १२ किलो सोनं काढण्यात आलं ज्याची किंमत ७ कोटींच्या घरात आहे. भारतात सोन्याची मागणी अधिक असल्याने तस्करीही मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय बघा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट