|

बदलापूर स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता, थोडी डुलकी लागली, डोळे उघडून पाहताच धक्का बसला

डोंबिवली : रेल्वेच्या बाकड्यावर झोपणे किती महागात पडु शकते याचा प्रत्यय एका व्यक्तीला नुकताच आला आहे.बदलापूर रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपलेल्या एका प्रवाशाच्या बॅगमधुन सोन्याचा २ लाख ४५ हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरून चोर फरार झाला होता.या चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवलीतुन अटक केली.

त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ऐवजापैकी २ लाख ३९ हजार रुपयांची रोकडं पोलिसांनी जप्त केला आहे.अनिल मासवकर(वय ५१) असे चोरट्याचे नाव आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चोरट्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापुर रेल्वे स्थानकात एक प्रवासी गेल्या आठवड्यात १० फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास लोकलची वाट पाहत बसला होता.कामाच्या थकव्यामुळे त्याला बाकड्यावर डुलकी लागली.या व्यक्तीकडं एक बॅग होती.या बॅगमध्ये सोन्याची चेन,मोबाईल, अंगठी आणि ९ हजारांच्या नोटा होत्या.अनिल हा तेथे गेला.प्रवासी गाढ झोपेत असल्याचे पाहुन त्याच्याजवळील बॅग हळुच बाजूला त्यातुन रोकडं घेऊन पसार झाला.

प्रवाशाला जाग आल्यावर त्याने बॅग चाचपडुन पाहिली असता त्यात काहीही नव्हते.भयभीत झालेल्या व्यक्तीने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात धाव घेतली.कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बदलापुर ते डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानक पट्ट्यातील cctv फुटेज तपासले.

प्रवाशांच्या बॅगेतील ऐवज लांबविणारा अनिल हा डोंबिवली परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली.तो एका ठिकाणी दडुन बसला होता.पथकाने त्या ठिकाणाहुन अनिलला ताब्यात घेतले.सुरुवातीला तो मी नव्हेच,असे सांगणाऱ्या या चोरट्याने पोलिसी खाक्या मिळताच व्यक्तीच्या बॅगमधील ऐवज लांबविल्याची कबुली दिली.त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *