बर्षभरापुर्वी लग्न, जालन्यात पतीनेचं अंगावर ट्रॅक्टर घालुन संपवल; भयंकर कारण उघडं

जालना : जालना जिल्ह्यातुन एक भयंकर घटना समोर आली आहे.एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालुन आपल्या बायकोला जिवानीशी मारलं.जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात हि धक्कादायक घटना घडली.कविता गजानन आव्हाड असे मृत महिलेचे नाव आहे.तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी पतीचे नाव आहे.या हत्येप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गजाननविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर अंगावर घालुन पतीनेचं बायकोची हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या कुंभारी परिसरात घडली आहे.कविता गजानन आव्हाड असे मयत महिलेचे नाव आहे.मृत महिलेचा वर्षभरापूर्वी आरोपी गजानन रघुनाथ आढाव याच्याशी लग्न झालं होतं.मागच्या काही दिवसांपासुन दोघांमध्ये सतत खटके उडायचे.याविषयी पती गजानन विरोधात हर्सुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती.

पुढं नातेवाईकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत भांडणं मिटवुन दोघांमध्ये समन्वय घडवुन आणला होता.त्यानंतर पती गजानन कविताला सासरी घेवुन गेला.मात्र ५ दिवसांपूर्वी कविताची सासु कौशल्या रघुनाथ आढाव हिच्यासह घरातील लोकांनी घर विकत घेण्यासाठी माहेरहुन ५ लाख रुपये घेवुन ये,यासाठी तिचा छळ करायला सुरुवात केली.अखेर पती गजानन याने तिचा खुन केला.तसेच नंतर ट्रॅक्टर अंगावर घालुन अपघाताचा बनाव केला.

याप्रकरणी मयत कविताच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी पती गजानन याच्याविरोधात हसनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हत्येप्रकरणी पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *