बळीराजाचं नशिब झटक्यात चमकलं; 70 लाख खिशात येताचं शेतकर्याला आंनदाश्रु

भोपाळ : देश आणि जगात अनमोल हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात पुन्हा एकदा एका शेतकऱ्याचं नशीब पालटलयं.शेतकरी आणि मनोरचे सरपंच प्रकाश मजिनुप यांनी त्यांच्या ५ साथीदारांसह जरुआपूर खाजगी क्षेत्रात खाण लावली होती,ज्यात 14.21 कॅरेटचा चमकदार हिरा सापडला आहे.

प्रकाश मजुमदार यांना याआधीही सुमारे 12 हिरे सापडले आहेत,त्यातील हा सर्वात मोठा हिरा आहे.त्यांनी साथीदारांसह मिळुन हा हिरा कार्यालयात जमा केला आहे.

सरपंच प्रकाश यांनी म्हटलयं कि,हिऱ्याच्या लिलावानंतर मिळालेली सर्व रक्कम ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतील.तर हिऱ्याचे जाणकार अनुपम सिंगने यांनी सांगितलं की,हा हिरा आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहे.२०२३ मधला हा सर्वात मोठा हिरा असुन त्याची किंमत जवळपास 70 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

शेतीत फायदा होत नसल्याचे पाहुन शेतकरी प्रकाश यांनी त्यांच्या काही साथीदारांसह 2019-20 मध्ये हिऱ्याची खाण उभारली.यानंतर त्यांना एकामागुन एक 11 हिरे सापडले.यामध्ये 7.44 कॅरेट, 6.45 कॅरेट, 4.55 कॅरेट, 3.68 कॅरेटसह काही छोटे हिरे सापडले आहेत.

२०२३ मध्ये सरपंच झाल्यानंतर प्रकाश यांना 3.64 कॅरेटचा हिरा आणि 12 फेब्रुवारी रोजी सापडलेला एक हिरा असे २ हिरे मिळाले आहेत.यावेळी सरपंचासह भारत मजुमदार,रामगणेश यादव,दिलीप मेस्त्री आणि संतु यादव यांचाही हिस्सा आहे.त्यांनी स्वतः खाणीत दिवस-रात्र कष्ट केलं आणि कामगारांकडुन काही कामं करून घेतली.यानंतर या ५ हि जणांचं नशीब उजळलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *