बसमध्ये बापाच्या वयाच्या व्यक्तीने मुलीच्या सीटवर खुलेआम केली लघवी, किळसवाणा व्हिडीओ समोर

कर्नाटक- चालु प्रवासात खुलेआम लघवी केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.यावेळी कर्नाटकातील एका बसमध्ये व्यक्तीने महिलेच्या सीटवर लघवी केल्याची घटना घडली आहे.हि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे चालवली जाणारी सरकारी बस होती.यापुर्वी अमेरिकेहुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती.

जेवणासाठी बस ढाब्यावर थांबली
मीडिया रिपोर्ट्सनुसार,हुबळीजवळ एका 52 वर्षीय व्यक्तीने बसमध्ये लघवी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.हि सरकारी स्लीपर बस विजयपुराहून मंगळुरूला जात होती.मिररच्या वृत्तानुसार,52 वर्षीय पुरुषाने 20 वर्षीय मुलीने बुक केलेल्या महिला सीटवर लघवी केली.हुबळीजवळील किरेसुर येथील ढाब्यावर रात्रीच्या जेवणासाठी बस थांबली होती,यावेळी हि अजब घटना घडली.या घटनेनंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला.

जुन महिन्यात न्यूयॉर्कहुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याची घटना समोर आली होती.बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने शेजारील सीटवर बसलेल्या महिलेच्या अंगावर लघवी केली होती.हि बाब समोर आल्यानंतर एअर इंडियाची चांगलीच कोंडी झाली आणि कंपनीलाही आपले नियम बदलावे लागले होते.एवढेच नाही तर लघवी करणाऱ्याला १५ दिवस तुरुंगात राहावे लागले.मात्र,नंतर त्याला न्यायालयातुन जामीन मिळाला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *