बापरे! नाशिकमधील मुलगा बंगालच्या मुलीमागं वेडापिसा झाला, थेट बंगाल गाठतं लाॅजवर गेला अन् सगळचं बिघडलं

प्रेमात लोक काय करतील हे सांगता येत नाही. प्रेम आंधळं असत असं म्हंटल जात. अशीच एक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दमानमधील एका लॉजमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.(The police found the dead bodies of the couple with garlands around their necks in a lodge).लॉजमध्ये जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. गळ्यात फुलांचे हार मुलीच्या कपाळावर कुंकू अश्या अवस्थेत पोलिसांना मृतदेह सापडला आहे. रुममध्ये पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली आहे.

या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे की,”बाबा, तुम्ही आम्हाला स्वीकारलं नाही आणि आम्हाला सोबत राहू दिलं नाही. मरणानंतर आम्हाला सोबत राहू द्या, आम्हाला वेगळं करू नका”.त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, या जोडप्याने आधी लग्न केलं आणि त्यानंतर आत्महत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना कुंकवाचा करंडा देखील सापडला आहे.

पूर्व बर्दमानच्या एका लॉजमध्ये रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. ५०६ क्रमांकाच्या खोलीत या जोडप्याचा मृतदेह आढळला आहे. दोघांनी रूम मध्ये लग्न करून आपले जीवन संपवले आहे.महादेव माजी (17) आणि प्रियंका मित्रा (१८) या दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. महादेव हा नाशिक जिल्ह्याचा आहे तर कोलकत्ताची प्रियंका आहे. रंगारी म्हणून महादेव काम करत होता. फेसबुकवरून या दोघांची ओळख झाली होती.

शनिवारी संध्याकाळी महादेव लॉजवर गेला होता. अशी माहिती पोलिसांना लॉजचा अकाऊंट तपासल्या नंतर भेटली आहे.एक रात्र थांबून सकाळी निघून जाईन असं महादेवने लॉजचा अकाऊंटंट मंडल याला सांगितले होते. त्यानंतर महादेवला ५०६ क्रमांकाची खोली देण्यात आली.पुढे मंडलने पोलिसांना माहिती दिली आहे की, महादेव दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीतून बाहेर पडला आणि थोड्या वेळात प्रियंकाल घेऊन आला.त्यावेळी लॉजमधील कर्मचाऱ्यांनी महादेव प्रियंकाबद्दल विचारले यावर महादेव म्हणाला, ती माझी बहिण आहे ती थोड्याच वेळात निघून जाईल.

मात्र बराचवेळ दोघेही रूममधून बाहेर निघाले नाहीत. म्हणून कर्मचाऱ्यांनी रूमचे दार वाजवले. आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही, म्हणून कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून याबद्दल माहिती दिली.पोलिसांनी दरवाजा तोडला. गळ्यात फुलांचे हार असलेल्या स्थितीत दोघांचे मृतदेह पोलिसांना सापडले. पंख्याला लटकून दोघांनी आपले जीवन संपवले होते.मुलीच्या कपाळावर कुंकू होतं. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *