बापानीचं २ मुलींना आणि पत्नीला जेवणातुन विष देऊन मारलं, तपासातुन भयंकर कारण समोर

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका निर्दयी व्यक्तीना बायको आणि २ मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला.३२ वर्षीय व्यक्तीनं तिघांच्या जेवणात विष मिसळुन त्याचा जीव घेतला.विजया(वय २८), निशा (वय ७) आणि दिक्षा(वय ५) अशी तिघांची नावं आहेत.तिघेही बंगळुरूच्या कोणानाकुंटेमध्ये राहतात.तर आरोपी नागेंद्रवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागेंद्रला दारुचं व्यसन होतं.त्यावरून पती-पत्नीमध्ये सातत्यानं वाद व्हायचे.२०१४ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.विजया हि एका औषध दुकानात सहायक म्हणुन काम करायची.गुरुवारी दुपारी विजया यांचा भाऊ शशीकुमार बहिणीला भेटायला घरी आला होता.त्यांनी दार ठोठावलं.मात्र आतुन प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर भावाला विजया आणि त्यांच्या २ मुली बेशुद्धावस्थेत आढळुन आली.शशीकुमार यांनी तातडीने त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं.मात्र डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केलं.

‘नागेंद्र बरोजगार आहे.त्याला कॅंसर झाला आहे.विजया कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती.पतीच्या उपचारांचा खर्च तीच करत होती.पतीला दारुचं व्यसन असुन तो गांजाचंही सेवन करायचा.तो पत्नीला अनेकदा पैशांसाठी मारहाण करायचा.त्याच्याविरोधात विजयानं अनेकदा पोलिसांत तक्रारही दाखल केली होती,’असं भाऊ शशीकुमारनं सांगितलं.

कोनानाकुंटे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतर नागेंद्रची चौकशी करण्यात येईल.’माझ्या लेकीच्या पैशांवर संपुर्ण कुटुंब चालत होतं.नागेंद्र रोज रात्री दारु पिऊन घरी यायचा आणि तिला खुप मारहाण करायचा.तिला नागेंद्रपासुन वेगळं व्हायचं होतं.मात्र आम्हीच तिला रोखलं होतं.घटस्फोटित महिलांकडे पाहायचा लोकांचा दृष्टीकोन चांगला नसतो असं म्हणत आम्हीच तिला रोखलं होतं.पण आता मी माझ्या मुलीसह नातींना गमावुन बसले,’असं विजयाची आई म्हणाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *