‘बाप मिटमिट डोळ्यानी पाहतोय फक्त’, अधिकारी होताचं संपवल; काळीज पिळवटुन टाकणारी दर्शनाबद्दल पोस्ट समोर

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच अनेकांना धक्का बसला होता. या प्रकारविषयी हळहळ व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर दर्शन पवार (Darshna Pawar) हिच्या मृत्यू संदर्भातील एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दर्शना पवारचा आतापर्यंतचा संघर्ष, शैक्षणिक कामगिरी आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांची झालेली अवस्था यावर भाष्य करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
जेव्हापासून ही बातमी कानावर आलिय मी एकदम सुन्न आहे. तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा. एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?

वडील साधे ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने. दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर, कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती. पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेल्या.

खचलेल्या दर्शनाला आता नेमकं काय करायचं कळत नव्हत तितक्यात MPSC च्या RFO परिक्षेची जाहिरात सुटल्याचं तिच्या लक्षात आलं. त्वरित अभ्यास सुरु केला पूर्व परीक्षा पास झाली मुख्य ही पास झाली आणि विशेष म्हणजे हा सगळा अभ्यास तिने गावी केला होता. मुलाखतीच्या तयारीसाठी ती काही वेळ पुण्यात होती मुलाखतीचा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पाडून लागलेल्या निकालात तीची RFO पदावर निवड झाली होती.

तिचा संघर्ष सांगताना कित्यकांचे डोळे पाणावले.गावात मिरवणूक निघाली कित्येक ठिकाणी सत्कार झाले आणि या सगळ्यात दर्शना व तिच्या घरातले खुश होते. पण अचानक हे घडलय. घरातले अजून धक्क्यात आहेत ही सापडलेली मुलगी आपली नाहीय हे त्यांना सतत वाटतंय पण दुर्दैवाने ती दर्शनाच आहे. हे नेमकं काय झालंय हे पोलीस तपासात उघड होईलच पण दीदींनो जपा स्वतःला, नका ठेऊ एखाद्यावर सहज विश्वास. थोडा वेळ जाऊद्या..

घरातल्यांसोबत सतत संवाद ठेवा जे जे काही वाटतय ते शेयर करत जा. आणि दादांनो दीदींनो दोघांनाही सांगतो राग आलाय तर ओरडा, चीडा हव असल्यास मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोला. माणूस दुखावेल आणि काही दिवसांनी शांत होईल पण दोघांचं आयुष्य सुखरुप राहील.

ससून मधून रात्री उशिरा निघताना अचानक लक्षात आलं की आज फादर्स डे आहे आणि बाप थंड झालेल्या चहाचा कप आणि फोडलेल्या बिस्किट पुड्यातलं एकही बिस्किट न खाता येणाऱ्या जाणाऱ्याकडे फक्त मिटमीट डोळ्याने पाहतोय….

ईश्वरा आपण माणूस आहोत याचा विसर पडू देऊ नकोस रे कोणाला…..

भावपुर्ण श्रद्धांजली

दर्शना पवार.

RFO, महाराष्ट्र राज्य.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *