‘बाबु ये ना प्लिज भेटायला…शिक्षकाला प्रियसीना भेटायला बोलावलं अन् तिला पाहताचं करंटच बसला

छत्तीसगडमधील जशपुर येथुन फसवणुकीचा एक गजबचा प्रकार समोर आला आहे.येथे एका तरुणाने मुलीचा आवाज काढुन एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.जवळपास वर्षभर त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं.एतकचं नाही तर त्याला लग्नाचीही ऑफर दिली.जेव्हा हा शिक्षक पुर्णपणे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतला गेला आहे याची खात्री पटली तेव्हा या भावड्याने त्या शिक्षकाकडुन तब्बल ४ लाख रुपये उकळले.

पीडित शिक्षकाने सांगितले की,त्याने मला भेटायला बोलावले.पहिल्यांदाचं आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जायचं असल्याने मी खुप उत्साहित होतो.मी तिच्यावर आतापर्यंत लाखो रुपये उडवले होते.मात्र मला जेव्हा समजले की माझी गर्लफ्रेंड मुलगी नाही तर मुलगा आहे,तेव्हा मी हैराणचं झालो.त्यानंतर फसवणुक झाल्यामुंळ मी त्वरित याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी याबाबत सांगितले कि,पीडित शिक्षक विद्याचरण पेकरा रायगड जिल्ह्यातील लैलुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे.त्याने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.तपासामध्ये शिक्षक हा जिला आपली प्रेयसी समजुन फोनवर बोलायचा ती मुलगी नसुन मुलगा असल्याचे उघडं झालेत.या मुलाने ड्रीम गर्ल बनुन शिक्षकासह अनेकांना ब्लॅकमेल केलयं.

पिडीत शिक्षकाने याने आपल्या तक्रारीत सांगितले की,डिसोंबर २०२१ मध्ये त्याची ओळख सरिता पैकरा नावाच्या मुलीशी झाली होती.स्वत:ची ओळख सविता अशी करून देणाऱ्या आरोपीने आपण धरारमपुर ब्लॉकमध्ये शिक्षीकेची नौकरी करत असल्याचं सांगितलं.सदर मुलगा हा मुलींचा आवाज एवढा हुबेहुब काढण्यात पटाईत होता की समोरचा त्याच्या आवाजाच्या जादुमध्ये हमकास अडकायचा.

आरोपीने मुलगी बनुन फिर्यादीकडून ४ लाख रुपयांहुन अधिकची रक्कम उकळली.पोलिसांनी आरोपीविरोधात कलम ४२० आणि आयटी अँक्ट अन्वये गुन्हा नोंद केला.त्यानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *