बायकोच्या कॅरेक्टवर संशय, म्हणुन घरात लावले २२ कॅमेरे अन् पतीना रेकाॅर्डिंग पाहिल्यावर….

Crime News : पतीच्या वागण्याला कंटाळून बंगळुरूमध्ये एका महिलेने असा काही कारनामा केला ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. पतीला आपल्या पत्नीच्या कॅरेक्टरवर संशय होता. असं सांगण्यात आलं की, या पतीने आपल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी कथितपणे 22 हिडन कॅमेरे आणि एक प्राइवेट डिटेक्टिव हायर केला होता. इतकंच नाही तर पतीने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिचा पाठलागही केला होता.

महिलेला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा ती चांगलीच संतापली. त्यानंतर कथितपणे तिने पतीला मारहाण केल. असं सांगण्यात आलं की, महिलेने क्रिकेटच्या बॅटने पतीचं डोकंही फोडलं.कपलचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या जन्मानंतर पती आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तो आपल्या पत्नीचा पाठलाग करू लागला. कथितपणे पतीने घरात अनेक हिडन कॅमेरे लावले. ते फोनला कनेक्ट करून तिच्यावर नजर ठेवत होता.

महिलेने पतीवर आरोप लावला आहे की, त्याने एक प्रायव्हेट डिटेक्टिव हायर केला होता आणि तो तिचा पाठलाग करत होता. महिलेने सांगितलं की, पतीने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी एक एसएलआर कॅमेराही खरेदी केला होता. इतकंच नाही तर पतीने काही पुराव्याच्या आधारे पत्नीला धमकीही दिली होती. महिलेने दावा केला की, आरोपी पतीने तिला नुकताच एक फोन गिफ्ट केला होता. मग तिला त्या फोनमधील एक सॉफ्टवेअरबाबत समजलं जे त्याने इन्स्टॉल केलं होतं.

महिलेने सांगितलं की, आरोपी पतीने काही फोटोंच्या आधारे तिला धमकी दिली होती. त्याचं म्हणणं होतं की, या फोटोत तिच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे, जो मुळात तिचा पुतण्या होता. जेव्हा फोटो दाखवून त्याने धमकी दिली तर महिला भडकली. नंतर क्रिकेटच्या बॅटने तिने पतीला मारहाण केली. त्यानंतर पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *