बायकोला रात्री चिकटून झोपण्याचे जबरदस्त फायदे, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी तर वाचुनचं घ्या
खरं तर आपल्या जवळच्या माणसाची एक मिठीचा खूप आधार वाटतो हे कोणीही मान्य करेल. पण त्यातही ती मिठी आपल्या बायकोची अथवा नवऱ्याची अथवा प्रियकर-प्रेयसीची असेल तर शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून दूर राहण्यास याच मदत मिळते. Science Alert ने केलेल्या अभ्यासानुसार जोडीदाराला मिठी मारून अथवा चिकटून झोपल्याने शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते असे सांगण्यात आले आहे.
US मध्ये ऑफिसला जाणाऱ्या १००० पेक्षा अधिक लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला आणि या व्यक्तींनी आपल्या जोडीदारासह चिकटून झोपायला सांगण्यात आले. त्यानंतर यावर अभ्यास करण्यात आला आणि त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत ही इंटरेस्टिंग माहिती (फोटो सौजन्य – iStock)
कसे आहेत फायदे
तणाव कमी होतो
तुम्ही दिवसभराच्या कामानंतर अथवा सततच्या त्रासानंतर रात्री आपल्या बायकोला अथवा नवऱ्याला चिकटून झोपल्याने शरीरातील थकवा कमी होऊन मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळते. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याजवळ आहे ही जाणीव मनातील ताण कमी करण्यास मदत करते.
चिंता – नैराश्य होते दूर
एकटे झोपल्याने चिंता आणि नैराश्याने अनेक माणसांना ग्रासले जाते. मात्र अभ्यासात आढळल्याप्रमाणे आपल्या जोडीदारासह झोपल्यामुळे चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत मिळते आणि आपल्यासह आयुष्यात आपलं माणूस आहे या विचाराने स्थैर्य येते.
रोमँटिक जोडीदारासह अधिक फायदा
अरिझोना युनिर्व्हसिटीच्या सायक्रियाट्रिस्ट ब्रॅडन फ्युएंट्सनुसार, रोमँटिक जोडीदारासह रोज रात्री झोपल्याने Sleep Apnea Risk कमी होते आणि त्याशिवाय झोपेमध्येही सुधारणा होते आणि रात्री ताणाशिवाय झोप लागण्यास मदत मिळते.
मानसिक आरोग्यात सुधारणा
अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती सिंगल आहेत, त्यापेक्षा जोडीदारासह एकत्र झोपल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होते आणि नात्यात अधिक बांधिलकी जपतात. तसंच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यास मदत मिळते.
लवकर झोप लागण्यास मदत
दिवसभर थकून आल्यानंतर ताणतणाव कमी करण्यासाठी जोडीदारासह जवळ झोपणे अथवा चिकटून झोपणे हा चांगला पर्याय समजण्यात येतो. यामुळे ताण कमी होऊन लवकर झोप लागते हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. तसंच आपल्या आवडत्या व्यक्तीचे बाजूला असण्याची भावना सर्व चिंता दूर सारून पटकन झोप लागण्यास मदत करते.
वेदना निवारक ठरते
आपल्या जोडीदारासह झोपल्याने मेंदूमधील रसायने बाहेर पडून अनेक वेदनांपासून मुक्तता होण्यास मदत मिळते. एका संशोधनानुसार, एकटे झोपणाऱ्या व्यक्तीपेक्षा आपल्या जोडीदारासह झोपणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य अधिक असते हे सांगण्यात आले आहे. आपल्या जोडीदारासह झोपणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेदना निवारक ठरते.