बायको मध्यरात्री उठली, किचनमध्ये जाऊन तेल फुल तापवलं; पतीच्या लिंगावर ओतलं, कारण ठरला तो प्रकार…
भोपाळ: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीच्या हातून मोबाईल खेचून घेणं एका तरुणाला महागात पडलं आहे. पतीनं हटकल्यानं पत्नी संतापली. तिनं पतीच्या गुप्तांगावर उकळतं तेल ओतलं आणि पसार झाली. गंभीररित्या भाजलेला तरुण आरडाओरडा करु लागली. त्यानंतर शेजारपाजारचे धावले.
त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. पीडित पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. फरार पत्नीचा शोध सुरू आहे.कंपू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माधव नगरात ही घटना घडली. माधव नगरात राहणारा सुनील धाकड (३२) खासगी नोकरी करतो. आपल्या अनुपस्थितीत पत्नी भावना शेजाऱ्याशी बोलते, अशी माहिती सुनीलला मिळाली.
त्यानंतर त्यानं पत्नीला समजावलं. मात्र तिच्यावर कोणताच परिणाम झाला नाही. सुनील घरी आला, तेव्हा भावना मोबाईलवर शेजारच्या तरुणाशीच गप्पा मारत होती. यावरुन सुनील संतापला. त्यानं पत्नीच्या हातातून मोबाईल खेचून घेतला. तिला चांगलंच सुनावलं. यामुळे भावनाला राग आला. पत्नीनं केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असं तिनं मनोमन ठरवलं.
मध्यरात्री दोनच्या सुमारास पती गाढ झोपेत होता. तेव्हा भावना झोपेतून उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तिनं एका टोपात तेल तापवलं. तेलाला उकळ येताच तिनं तो टोप पतीच्या अंगावर ओतला. यानंतर भावना तिथून पसार झाली. भाजून निघालेला सुनील आरडाओरडा करु लागला. त्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक जमले. शेजाऱ्यांनी धाव घेतली. सुनीलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालय गाठलं. पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा शोध सुरू आहे.