बायको सोडून गेली, घरी २ कॉलगर्ल बोलवू लागला; दोघींना शारिरीक भुक भागवली पण दारुच्या नशेत खेळचं फिरला

कल्याण : पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीला कॉलगर्लचा नाद जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांची उधळपट्टी पाहून दोन कॉलगर्लनी आपापल्या बॉयफ्रेडशी संगनमत केलं. संबंधित व्यक्तीच्या घरातील रोकड चोरण्याच्या उद्देशाने त्याची धारदार चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना कल्याण – पडघा मार्गावरील बापगांव गावातील मल्हारनगर येथील एका चाळीत घडली आहे.

या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन कॉलगर्लसह त्यांच्या एक साथीदाराला अटक, केली आहे. मात्र गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.शिवानी, भारती अशी अटक केलेल्या कॉलगर्लची नावे असून संदीप पाटील असे अटक केलेल्या कॉलगर्लच्या साथीदाराचे नाव आहे. हे तिघेही उल्हासनगर मधील माणेरे गावात राहणारे आहेत.

देवा रॉय (रा. गायकवाड पाडा अंबरनाथ ) असे फरार आरोपीचे नाव आहे. तर दीपक कुऱ्हाडे (वय ४२) असे निर्घृण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक दीपक हा गेल्या चार वर्षापासून बापगाव मधील मल्हार नगरमधील चाळीतील एका खोलीत पत्नीपासून विभक्त राहत होता. तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून इंटिरियरचे कामे घेण्याचा ठेकेदार होता.

त्यातच गेल्या तीन वर्षांपासून त्याची ओळख आरोपी कॉलगर्ल शिवानीशी झाली. स्वतःची शारीरिक भूक भागविण्यासाठी तो तिला कॉल करून घरी बोलवत होतत्यावेळी तो तिच्यावर पैशांची उधळपट्टी करुन मद्यधुंद अवस्थेत शारीरिक भूक भागवत होता. तर कधी कधी दोन कॉलगर्ल घरी बोलवून दोघींशी शारीरिक संबंध ठेवत होता.

त्यातच मध्यंतरी आरोपी शिवानीने दीपकच्या घरी येणे बंद केल्याने २९ जून २०२३ रोजी तिला कॉल करून शिवीगाळ केली होती. त्याचा राग धरून तिने साथीदार संदीप, तिची मैत्रीण कॉलगर्ल भारती आणि तिचा बॉयफ्रेड देवा यांच्याशी संगनमत मृताच्या घरातील ऐवज आणि रोकड लुटण्याचा कट रचला होता.

दीपकने आरोपी शिवानीला कॉल केला. तेव्हा ३० जून २०२३ रोजी दोघी आरोपी कॉलगर्ल रात्रीच्या सुमारास दीपकच्या घरी रिक्षाने आल्या होत्या. त्या रात्री दोघींनी दीपकसोबत शारीरिक संबंध ठेवत त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर दोघींचे बॉयफ्रेड अॅक्टिव्हावरुन दीपकच्या घरी पोहचले असता, या चौघांनी मिळून दीपकच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्याचा धारदार चाकूने गळा चिरला. जाताना त्यांनी दीपकच्या घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. शेवटी एकाच अॅक्टिव्हावरून चौघे फरार झाले होते.

दरम्यान, २ जुलै २०२३ रोजी दीपकच्या आईने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आईने कल्याणला राहणाऱ्या त्याच्या विभक्त पत्नीकडे कॉल करून चौकशी केली. दीपकच्या घरी काहीतरी घडलंय का बघून ये, असे सांगितले. त्यानंतर दीपकची मुलगी बापगावला आली. तेव्हा वडील राहत असलेल्या घराला बाहेरून कडी लावलेल्याचं तिला दिसलं. कडी उघडल्यावर घरात वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करून अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे, सपोनि नितीन मुद्गुल आणि ग्रामीण गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस सुरेश मनोरे यांच्या पथकाने सुरु केला.

परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि मृताच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करून मोबाईल लोकेशनवरून आरोपी शिवानीला उल्हासनगर मधील माणेरे गावातून ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने आरोपी संदीप, देवा आणि भारती असे चौघांनी मिळून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.

त्यानंतर ४८ तासातच आरोपी संदीप आणि भारतीला ताब्यात घेऊन अटक केली. तर आरोपी देवा अद्यापही फरार आहे. पोलिसांनी अटक आरोपीकडून ३० हजार रुपये रोख, चाकू, आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *