|

बारामतीत घरकुल मिळवून देण्याच्या बदल्यात ग्रामसेवकाची ‘ विचित्र‘ मागणी , अंधारात बोलावलं अन्..

पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या बारामती परिसरात समोर आलेले असून एका ग्रामसेवकाने चक्क एका महिलेला तुला घरकुल मिळून देतो असे म्हणत जवळ ओढलेले आहे. त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 25 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास बारामती शहरातील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही बारामती तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून आरोपीचे नाव महादेव सालगुडे असे असल्याचे समजते. पीडित महिला ही बारामतीत काम करत आपल्या कुटुंबाची उपजीविका करते. गावातील घरकुला संदर्भात तिचे ग्रामसेवक सालगुडे याच्यासोबत फोनवर बोलणे झालेले होते.

25 तारखेला पीडित महिला ही मांढरदेवीला गेलेले असताना आरोपीचा तिला फोन आला आणि त्याने तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले. महिलेने मी सध्या बाहेरगावी आहे रात्रपाळीला कामाला जाणार आहे असे सांगितल्यानंतर आरोपीने तिला तुम्हाला कामावर मी सोडतो असे देखील तो म्हणाला आणि सावली हिल इथे तिला रात्री बोलावलेले होते.

गाडीवर बसल्यानंतर महिलेने ‘ मला कामाला उशीर झाला आहे पटकन सोडवा ‘ असे सांगितले मात्र त्याने कामाच्या अलीकडे गाडी थांबवली आणि तिला स्वतःकडे ओढत मला तू खूप आवडतेस. मला तू हवी आहेस माझे काम कर तुला घरकुल मिळून देतो असे म्हणत तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला आणि महिला पोलिसात दाखल झाली. सदर प्रकरणी पोलिसांनी ग्रामसेवकाच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *