बीडच्या ३६ वर्षीय मराठा बांधवाचा गेला जीव, घटनेनी सर्वत्र हळहळं😥
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी राज्यभरातून लाखो नागरिक आंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. डोळे दिपवणारी ही गर्दी होती.मात्र उन्हाचा तडाखा खूप असल्याने मराठा बांधवांना काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागले. दरम्यान सभेसाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विलास पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. विलास बीडच्या गेवराई येथून या सभेसाठी जालन्यात आला होता. (Latest Marathi News)विलास पवार या तरुणाला चालून चालून अतिशय थकवा आला होता. त्यानंतर चक्कर येऊ लागल्याने एका ॲम्बुलन्समधून त्याला गेवराई येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स देखील अडकली आणि सराटे अंतरवली ते गेवराई येथे येण्यासाठी तीन तास लागले.
याच दरम्यान विलास याचा ॲम्बुलन्समध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विलास पवार याला चक्कर आली होती. त्याचबरोबर उलट्यांचा त्रासही त्याला जाणवत होता. उष्माघातामुळे विलासचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.