बुलढाण्यातील अधिकार्याला गे मित्रासह त्याच्या पत्नीशी शारिरीक संबंध ठेवण्याचा नाद अन् एकदा सेक्स करतांना…

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण जालना जिल्ह्यातील इथे येथे समोर आलेले असून बाजार समितीच्या आवारामध्ये 8 एप्रिल रोजी चाळीस वर्षीय प्रदीप भाऊराव कायंदे ( राहणार उंबरखेड तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता.

बँकेचे वसुली अधिकारी म्हणून काम करत असलेल्या या व्यक्तीचा कुणी खून केला याची परिसरात जोरदार चर्चा होती मात्र मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आणि अखेर विवाहबाह्य समलैंगिक संबंधातून हा प्रकार झाल्याचे समोर आलेले आहे.

प्रदीप कायंदे हा गेल्या काही दिवसांपासून एका गे ग्रुपच्या संपर्कात आलेला होता. एका ॲपच्या माध्यमातून त्याची आरोपीसोबत ओळख झालेली होती. प्रदीप यांच्या नोकरीचे ठिकाण जालना होते त्यामुळे तो जालन्यावरून ये जा करत असायचा आणि जेव्हा कधी त्याला लहर आली की तो त्याचा परिसरातील समलैंगिक असलेला मित्र सोपान सदाशिव बोराडे यांच्या मंठा येथील शांतीनगर परिसरात असलेल्या घरी जात असायचा.

गेल्यात दोन वर्षांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता.सोपान बोराडे यांच्या घरी गेल्यानंतर सर्वप्रथम तो सोपान याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचा आणि त्यानंतर सोपानच्या पत्नीसोबत देखील तो शारीरिक संबंध ठेवत असायचा. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा हा नित्यक्रम बनलेला होता मात्र 7 एप्रिल रोजी सोपान बोराडे आणि प्रदीप कायंदे यांच्यात वाद झाला.सोपान बोराडे याने तात्काळ त्याच्या काही मित्रांना बोलावून प्रदीप याला बेदम मारहाण केली त्यानंतर तो जागेवरच मयत झालेला होता.

सोपान बोराडे याने त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांच्या मदतीने मृतदेह उचलला आणि मंठा बाजार समितीच्या आवारात घेऊन फेकून दिला.पोलिसांच्या ताब्यात काही व्हिडिओ कॉल, फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आलेले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोपान बोराडे आणि त्याचा भाऊ प्रकाश बोराडे यांना अटक करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणात इतरही काही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत असून अवघ्या काही दिवसांच्या आत मुख्य आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *